ordnance factory recruitment 2024: सर्व फिल्डमधील ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या युवकांसाठी भारत सरकार अंतर्गत होणार पदभरती!प्रशिक्षण तसेच पगारही दिला जाणार!apply now
ordnance factory recruitment 2024
ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व युवकांसाठी एक फार आनंदाची बातमी आहे. पदवीधरांसाठी संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारकडून पदभरती राबविण्यात येत असून नोकरीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम काम करावे लागणार आहे. नोकरीसाठी प्रशिक्षण देणारी संस्था सरकारी असणार आहे. चला तर मग बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत ग्रॅज्युएशन (ordnance factory recruitment 2024)झालेल्यांसाठी विविध पदे भरण्यासाठी पदभरती होणार आहे.ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट येथे ही पदभरती होणार आहे.आणि येथे तुम्हाला अॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग दिली जाणार असून त्याचबरोबर पगारही देण्यात येणार आहे. हा उपक्रम संरक्षण मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारकडून राबविण्यात येत आहे.
अधिक माहिती येथे पहा
20 जुलै 2024 पर्यंत इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात.
या पदभरती मध्ये भरण्यात येणारी पदे खालीलप्रमाणे:
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी (ग्रॅज्युएट इंजिनीअर्स), ग्रॅज्यएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम) आणि टेक्निशियन प्रशिक्षणार्थी(डिप्लोमा होल्डर्स)ही सर्व पदे ऑफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे.
चला तर बघुयात पदांनुसार रिक्त पदे आणि पगाराविषयी माहिती:
ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्सची 45 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. आणि या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे. या पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सांगायचं झाल्यास उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
ग्रॅज्यएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम)ची 45 रिक्त पदे भरण्यात येणार असून या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून बीकॉम बीएससी किंवा बीसीए मध्ये पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 9000 रुपये स्टायपेंड देण्यात येणार आहे.
हे पण वाचा
ordnance factory recruitment notification2024:
टेक्निशियन प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा होल्डर्स) ची 50 जागा भरण्यात येणार असून अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.9 हजार इतका स्टायपेंड दिला जाणार. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच डिप्लोमा किंवा पदवी करून उमेदवाराला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तो उमेदवार अर्ज करायला पात्र ठरणार नाही तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा
एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे:(ordnance factory recruitment 2024 apply offline)
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर(ordnance factory recruitment 2024 official website) https://munitionsindia.in/career/ वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.या उमेदवारांनी आपले अर्ज द चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, चंदा, चंद्रपूर, महाराष्ट्र-442501 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
Ordnance Factory Recruitment 2024 – FAQs
1. ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कोणत्या पदांसाठी भरती आहे?
ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्स, ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम) आणि टेक्निशियन प्रशिक्षणार्थी (डिप्लोमा होल्डर्स) या पदांसाठी भरती आहे.
2. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे?
ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्स: मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित इंजिनीअरिंगची पदवी.
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम): मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम, बीएससी किंवा बीसीएम मध्ये पदवी.
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी: मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा.
3. या पदांसाठी वयोमर्यादा काय आहे?
या पदांसाठी वयोमर्यादा 24 वर्षे आहे.
4. या पदांसाठी निवड प्रक्रिया काय आहे?
निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत यांच्यावर आधारित असेल.
5. या पदांसाठी स्टायपेंड किती आहे?
ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर्स: दरमहा ₹9,000
ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी (जनरल स्ट्रीम): दरमहा ₹9,000
तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी: दरमहा ₹9,000
6. या पदांसाठी अर्ज कसा करायचा?
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://munitionsindia.in/career/ वरून अर्ज डाउनलोड करून, आवश्यक कागदपत्रांसह, द चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, चंदा, चंद्रपूर, महाराष्ट्र-442501 या पत्त्यावर पाठवावा.
7. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2024 आहे.
8. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट भेट देऊ शकतात.
9. या भरती प्रक्रियेबाबत काही प्रश्न असल्यास कोणाशी संपर्क साधावा?
या भरती प्रक्रियेबाबत काही प्रश्न असल्यास, उमेदवार https://ddpdoo.gov.in/units/OFCH या संकेतस्थळावरील ‘संपर्क’ विभागाचा वापर करू शकतात.
10. या भरतीसाठी कोण पात्र आहे?
ज्या उमेदवारांनी संबंधित पदवी/डिप्लोमा पूर्ण केले आहे आणि त्यांचे वय 24 वर्षे आहे ते या भरतीसाठी पात्र आहेत.
संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
5 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेलेली पदवी/डिप्लोमा स्वीकारले जाणार नाही.
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.