आनंदाची बातमी!मुलींना मिळणार मोफत शिक्षण;महाविद्यालयांनी शुल्क मागितल्यास थेट कार्यवाही!Free education to all students Maharashtra 2024 (GR प्रसिद्ध)
Maharashtra Free education 2024
नमस्कार, आजची सर्वात आनंदाची बातमी म्हणजेच राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार अशी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे. आणि तसेच या संबंधीचा जीआरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढायला हवे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी मिळायला पाहिजे, आणि तसेच महिलांचे सक्षमीकरणही व्हावे व आर्थिक स्थिती उत्तम नसल्याकारणाने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शिक्षणापासून मुली वंचित राहायला नको यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल.अशी घोषणा सरकारने केली आहे. हा निर्णय शासनाने घेऊन घेतला असून विद्यापीठ आणि तसेच महाविद्यालयांनी या घोषणेची तातडीने अंमलबजावणी सुरू करावी असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत.
- या योजनेसाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- यातून 20 लाख मुलींना लाभ मिळण्याचा अंदाज आहे.
मित्र-मैत्रिणींनो मुलींना उच्च शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये संपूर्ण सूट मिळावी यासाठी निर्णय घेण्यात यावा म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड व संबंधित अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांना उपस्थित करण्यात आलं होतं.
इतर माहितीसाठी येथे क्लिक करा
कोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळेल?
माननीय मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू करावा. आठ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आणि इतर मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्कात व तसेच परीक्षा शुल्कातही संपूर्ण सूट देण्यात आली असून याची अंमलबजावणी तातडीने सुरू करावी. आणि तसेच जर एखाद्या विद्यापीठाने किंवा महाविद्यालयांनी मुलींकडून शिक्षण शुल्क किंवा परीक्षा शुल्क वसूल केल्याची तक्रार जर आली तर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असेही माननीय मंत्री श्री चंद्रकांत पाटील हे म्हणाले.
शिक्षणासाठी फी भरण्याची आवश्यकता नाही;
आणि तसेच दुसरी आनंदाची बातमी म्हणजेच महिला व बालविकास विभाग यांनी “संस्थात्मक” व “संस्थाबाह्य” या वर्गवारीमध्ये जी अनाथ मुले आणि मुली समाविष्ट आहेत त्यांना देखील मोफत शिक्षण मोफत देण्यात येणार असून तसेच तृतीयपंथी विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिपत्याखालील अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क देण्याची आता गरज नाही.
- असे चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे.
- या शासन निर्णयाविषयीच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत.
हे पण पहा
Maharashtra Free Education FAQs
1.कोणत्या मुलींना मोफत शिक्षण मिळेल?
8 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील मुलींना हे शिक्षण मोफत मिळेल.
अनाथ मुली आणि तृतीयपंथी विद्यार्थी यांनाही शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे.
2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींनी काय करावे लागेल?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया नाही.
संबंधित विद्यापीठे आणि महाविद्यालये 8 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा आणि इतर निकषांवर आधारित पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करतील.
3. कोणत्या अभ्यासक्रमांसाठी हे मोफत शिक्षण उपलब्ध आहे?
हे मोफत शिक्षण व्यावसायिक शिक्षणाच्या 642 अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध आहे.यात कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
4.या योजनेसाठी किती तरतूद करण्यात आली आहे?
या योजनेसाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
5.यातून 20 लाख मुलींना लाभ मिळण्याचा अंदाज आहे.
या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार?ही योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू होईल.
6.या योजनेची अंमलबजावणी कोण करेल?
उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभाग या योजनेची अंमलबजावणी करेल.विद्यापीठे आणि महाविद्यालये पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करतील आणि त्यांचे शिक्षण शुल्क भरण्यास मदत करतील.
7. या योजनेबाबत तक्रार करायची असल्यास कुठे संपर्क साधावा?
विद्यार्थी शिक्षण शुल्क किंवा परीक्षा शुल्क आकारले जात असल्यास उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार करू शकतात.
8.या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
9. या योजनेचा महाराष्ट्रातील शिक्षणावर काय परिणाम होईल?
या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाच्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे.यामुळे लिंगभेद कमी होण्यास आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळण्यास मदत होईल.
10.या योजनेबद्दल तुमचे काय मत आहे?
ही एक उत्तम योजना आहे जी मुलींना शिक्षण घेण्यास आणि समाजात समान संधी मिळवण्यास मदत करेल.यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
लक्ष द्या:
व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हव्या असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे. मोफत जॉबअलर्टसाठी
तुम्ही ही नक्की व्हाट्सअप चैनलमध्ये जॉईन व्हा.इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉबअलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtraboardsolutions.com ला भेट द्या. धन्यवाद!
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा