सर्वात आनंदाची बातमी!युवा वर्गासाठी सरकारची नवीन योजना; ही कागदपत्रे नसतील तर अर्जदार अपात्र!पाच मिनिटात येथे करा अर्ज!
cm yuva karya prashikshan yojana maharashtra 2024
राज्यातील बेरोजगारी कमी करण्याच्या हेतूने सरकारने युवा वर्गासाठी युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळामध्ये शासनाकडून विद्यावेतन दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी सर्व युवकांनी नोंदणी करावी असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.
बऱ्याच युवकांचे शिक्षण पूर्ण झाले असून शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण-तरुणींना कामाचा अनुभव नसल्याकारणाने अपेक्षित नोकरी मिळतच नाही. आणि त्यामुळेच बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते पदवीत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळामध्ये शासनाकडून दर महिन्याला विद्यावेतन देण्यात येणार आहे. आणि या योजनेसाठी उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे.
2024-25 या आर्थिक वर्षामध्ये राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेचा लाभ घेता येणार असून की किमान 20 रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे.
इतर महितीसाठी येथे क्लिक करा
परंतु जर एका महिन्यामध्ये दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्यांना विद्यावेतन मिळणार नाही.
मित्रांनो आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी व पदवी उत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व अप्रेंटिस बंधनकारक असून त्या तरुणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ घेता येणार आहे. विनाअनुभव रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आता आस्थापन उद्योगात प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेअंतर्गत उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी सहा महिन्यांचा असून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाकडून विद्या वेतन देण्यात येणार आहे.आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना संबंधित आस्थापने करून प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे.
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:
या योजनेविषयीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली दिलेली आहेत:
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Cm Yuva Karya Prashikshan Yojana FAQs)
1. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे?
ही योजना बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षण काळात दरमहा विद्यावेतन देऊन त्यांना कामाचा अनुभव देण्यासाठी राबवण्यात येत आहे.
2. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
महाराष्ट्रातील रहिवासी, बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेले उमेदवार या योजनेसाठी पात्र आहेत.
3. या योजनेतून मिळणारे विद्यावेतन किती आहे?
शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा विद्यावेतन खालीलप्रमाणे आहे:
इयत्ता बारावी उत्तीर्ण: ₹ 6,000
आयटीआय, पदविका: ₹ 8,000
पदवीधर-पदव्युत्तर: ₹ 10,000
4. या योजनेसाठी कशी नोंदणी करावी?
उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी.
5. या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल?
योजनेची कार्यपद्धती निश्चित झाल्यानंतर काही दिवसांत या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल.
6. या योजनेसाठी पात्रतेची काय निकष आहेत?
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
उमेदवाराने बारावी ते पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
7. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्राची छायाप्रत
आधार कार्डाची छायाप्रत
महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
8. या योजनेतून प्रशिक्षण घेण्यासाठी किती दिवसांची उपस्थिती आवश्यक आहे?
प्रशिक्षणार्थीला प्रत्येक महिन्यात किमान 10 दिवस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
9. या योजनेतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर काय मिळते?
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.
10. अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संपर्कांशी संपर्क साधू शकता:
कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे संकेतस्थळ
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
तहसील कार्यालय