10th ssc Marathi first language sample paper
10th ssc Marathi first language sample paper
मराठी (प्रथम भाषा)
विभाग १ : गद्य ( १८ गुण )
पठित गदय
प्रश्न 1 .
(अ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
१. एका शब्दात उत्तर लिहा.
(i) पुस्तकांची वाट पाहण्यात
(ii) घरामागे एक मोठ्ठं झाड
पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देशा, न पाहिलेली माणसं, ऊनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणान्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणान्या ! न्डजे, जग असंही असतं तर…! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! नल भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स !
आणखी एक वाट पाहणं होतं. पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठुं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले क्न त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेक्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी उउक सुंदर होऊन जायचं ! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची.
२. चूक की बरोबर ते लिहा:
(i) पोपटांचे थवे उंबरावर उतरायचे.
(ii) पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात थंडीच्या आधीचा काळ
3. स्वमत
पुस्तकांची वाट बघण्यातील गंमत लेखिकेच्या अनुभवाच्या आधारे तुमच्या राब्दांत स्पष्ट करा.
(अ) उतान्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कृंती करा:
संत नामदेवांनी देवाला
अशी विनंती केली आहे.
नंन न्यमदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की, देवा मला सतत नम्र राहू दे. मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. नाभुनात उमंटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विन्टन्ता ऋं्डाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच रिकवतात.
नंत एक्नाधांनी ‘सर्वांभूती भगवद्भावो। हा चि निजभक्तीचा ठावो।’ असे म्हटले आहे. प्राणिमात्रात मैत्री असली की विश्व आनंदनें रहू इकते. मैत्री म्हणजे नुसते देणे-घेणे नव्हे. मानवी सुख-दु:खारी सहद्य मनाने समरस होणे, दुसन्याच्या आनंदात आनंद ननमें, डुनचाच्या डु:खात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे; असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. नंउ अभ्रन्तध ‘सर्वांभूती भगवद्भावो।’ असे म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी ‘भूतां परस्परें पडो, मैत्रं जीवाचें’ असे म्हणतात.
नं तुक्कारन्नंगी देवापाशी ‘सतसंग देई सदा।’ असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली, तर चंगल्ध प्रकानचंचे क्रम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम,महाराज सांगतात, ‘एक्ड नंका जाहय ऊर्नं। अवघे धरूं सुपंथ।’ संत स्वतुःसाठी काहीही मागत नाहीत. जगाच्या कल्याणासाठी ते प्रार्थना करत असतात.
२. कोण ते लिहा :
(i) मानवी जीवनाचे कल्याण करणारे
(ii) विश्व आनंदात राहू शकणारी
३. स्वमत
मैत्रीचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अपठित गद्य
(इ) उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. (i) भाषेची वैशिष्टये लिहा.
(ii) भाषेची कार्ये लिहा.
भाषा ही मानवाची विशेष निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचे प्रभावी माध्यम आहे. तसेच ते एक ज्ञान संपादनाचे व अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे. एका रातकाकडून दुसच्या रातकाकडे वाटचाल करताना भाषा ही नेहमी भूतकाळाला सोबत घेऊन वर्तमानाला आपल्यात सामावून घेत, भविष्याकडे वाटचाल करीत असते. भाषा आणि सांस्कृतिक वारसा यांचे जैविक नाते असते. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुढच्या पिढीकडे संक्रमण भाषेद्वारा होत असते. नवे संबोध, नव्या संज्ञा, नव्या कल्पना, नवे विचार यांच्याद्वारे सांस्कृतिक वारशात पडणारी भर भाषेला समृद्ध करत असते. हे सारे मुख्यतः साहित्याच्या माध्यमातून होत असते म्हणूनच प्राथमिक स्तरापासून मुलांच्या वयाशी सुसंगत अशा साहित्याचा समावेशा अभ्यासक्रमात केला जातो. त्या साहित्यामुळे विद्याथ्यांचे भावनिक जीवन संतुलित बनते, वैचारिक समृद्धता येते आणि भाषिक कौशल्ये सहज साध्य होतात. नक्हे, तर साहित्यातून मूल्यसंस्कार होतात. वाङ्मयीन अभिरुची वाढते. व्यक्तिमत्त्व संपन्न होते. निसर्ग राष्ट्र, समाज यांच्याबद्दल प्रेम व कर्तव्य वाटून नैतिक संस्कार होतात व त्यातून खया जीवनाचा आस्वाद घेता येतो.
२. आकृतिबंध पूर्ण करा.
विभाग 2
प्रश्न २.
( अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा.
(i) कवितेत कवि संत रामदास यांनी सुचवलेले मत लिहा.
(ii) संत रामदास यांचे सभेत वागण्याचे मत लिहा.
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण।
जेगें करितां बाणे खुण। सर्वज्ञपणाची।। १॥
वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळरवल्यिाविण खाऊं नये।
पडिली वस्तु घेऊं नये। येकायेकीं।। २॥
जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळी।। ३।।
तोंडळासीं भांडों नये। वाचाळासी तंडों नये।
संतसंग खंडूें नये। अंतर्यामीं ॥४॥
आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये।
शोधिल्याविण करुं नये। कार्य कांही।।६॥
सभेमध्ये लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
पैज होड घालूं। कांही केल्या।। ६ ।
२. चौकटी पूर्ण करा:
(i) ओळरवल्याविन न खाणारे
(ii) मनात न आणणारे
३. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
कोणाचा उपकार घेऊं नए। घेतला तरी राखों नये।
परपीडा करूं नये। विश्वासघात ॥
४. काव्यसौंदर्य :
“वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखल्याविण खाऊँ नये”
‘वरील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
(आ) खालील मुद्दयांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
‘जय जय हे भारत देशा किंवा ‘उत्तम लक्षण’ | |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
(ii) कवितेचा विषय | |
(iii) कविता आवडण्यची वा न आवडण्याची कारणे |
( इ) रसग्रहण :
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
‘भातुकलीतून प्रवेराताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन’.
विभाग ३ : स्थूल्वाचन ( ६ गुण )
प्रश्न ३.
खाल्गिल्भैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
१. कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दांत लिहा.
२. ‘माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.
३. वीरांगना पाठाच्या आधारे टीप लिहा-रेखाजींच्या कार्याचा परिणाम.
विभाग ४ : भाषाभ्यास १६ गुण
प्रश्न ४.
( अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१. समास:
खालील तक्ता पूर्ण करा:
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(i) दररोज | ||
(ii) | बरे किंवा वाईट |
२. शब्दसिद्धी:
खालील तक्ता पूर्ण करा:
रात्रभर, अपयश, गडगडाट, बोटभर
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
३. वाक्प्रचार:
(१) खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) कान देऊन ऐकणे | (अ) एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे |
(ii) तगादा लावणे | (ब) आश्चर्याने ऐकणे |
(क) लक्षपूर्वक ऐकणे |
(२) कंसातील वाक्प्रचारांचा त्या खालील वाक्यात योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
(डंका वाजवणे, धीर चेपणे, आव्हान स्वीकारणे)
(i) मानसीची पोहण्याची भीती गेल्यामुळे ती आता कोठेही पोहू राकते.
(ii) नवीन भ्रमणध्वनीचा अतिप्रचार केल्याशिवाय त्याचा खप होणे अराक्यच !
( आ) भाषासौंदर्य :
१. इाब्दसंपत्ती :
(१) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
(i) मंदिराच्या आतील भाग
(ii) ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा-
(२) खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा:
(i) कंठ
(ii) मयूर
(३) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) श्रीमंती
(ii) अर्थ
( ४) खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
जादूगार (जादू व गार हे शब्द वगळून)
२. लेखननियमांनुसार लेखन :
अचूक रब्द ओळखा:
(i) पुनर्बांधणी/पुनरबांधणी/पुनर्बांधनी/पुर्णबांधणी
(ii) अंधकार/अंधःकार/अंधक्कार/अंधःक्कार
(iii) कौटूंबिक/कौटुंबिक/कौटूंबीक/कोटुंबीक.
(iv) दीर्घायुष्य / दिर्घायुष्य/दीर्घायूष्य/दिघार्युष्य.
(v) उज्ज्वल / ऊज्वल / उज्वल / ऊज्जवल
(vi) दूष्काळ/पुष्कळ/दुष्काळ/दूशकाळ
३. विरामचिन्हे:
खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा:
(i)
(ii)?
४. पारिभाषिक राब्द
खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
(i) Index
(ii) Honourable
विभाग ५ : उपयोजित लेखन २४ गुण
विभाग-१ : गद्य ( इ ) [ प्रश्न क्रमांक १ ( इ ) ] मधील अपठित गदय उतान्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा:
( आ) खाल्ग्रिल्यैकी कोणत्याही दोन कृती सोडवा:
( शब्दमर्यादा प्रकारानुसार ६० से ९० शब्द )
१. जाहिरातलेखन:
खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा.
|
|
|
|
२. बातमीलेखन:
खालील विषयांवर बातमी तयार करा:
शाळेत साजरा करण्यात आलेल्या वृक्षारोपणाची बातमी:
३. कथालेखन:
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा. (दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
रायचूर गावात भैरू नावाचा किराणा माल विकणारा एक दुकानदार राहत होता. तो किराणा माल खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात असे. एके दिवरी दुकानातला किराणा माल संपला म्हणून तो तालुक्याच्या गावी माल खरेदी करण्यासाठी निघाला. थंडीचे दिवस होते. हवेत बराच गारवा होता. मजल-दरमजल करत भैरू रस्त्याने चालला होता. इतक्यात आपल्या मागोमाग कुणीतरी येत असल्याचा त्याला आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले आणि. …
(इ) खाल्ग्रिल लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
१. प्रसंगलेखन:
वरील समारंभ प्रसंगी तुम्ही प्रेक्षक म्हणून उपस्थित आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
२. आत्मकथन :
खालील चित्रातील घटक तुमच्याशी आहे अशी कल्पना करून तक्ता घटकाचे आत्मकथन लिहा. ‘मी मराठीचे पाठ्यपुस्तक’
३. वैचारिक :
खाली दिलेल्या मुद्द्यांवर तुमचे विचार लिहा
श्रम हा ऐहिक सुखाचा मूळमंत्र
श्रम हे निरोगी कायासाठी आवश्यक
श्रम हे संस्कार आणि संस्कृती जपण्यासाठी आवश्यक
श्रमाने मन प्रसन्न व तन उत्तम राहाते
श्रम हे जीवनात यशाची गुरुकिल्ली
उत्तरपंत्रिका
उत्तर १ :
(अ) .
(i) पुस्तकांची वाट पाहण्यात
(ii) घरामागे एक मोठ्ठं झाड
एक गंमत |
उंबराचं |
२.
(i) पोपटांचे थवे उंबरावर उतरायचे.
(ii) पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात थंडीच्या आधीचा काळ
बरोबर |
चूक |
३. पुस्तक वाचताना निरनिराळ्या पुस्तकांची माहिती होते. पुस्तकामध्ये निरनिराळ्या देशांची माहिती, तेथील माणसांचे जीवन, काही प्रसंग, तेथील सौन्दर्य या सर्व गोष्टी लेखकाने या पुस्तकात आपल्या भाषारौलीत मांडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला न पाहिलेले देशा, न पाहिलेली माणसे, .न अनुभवलेले प्रसंग या सर्व गोष्टी पुस्तकामुळे मिळतात. म्हणून पुस्तकाची वाट पाहण्यात गंमत आहे हे दिसते.
( आ) १. संत नामदेवांनी देवाला
अशी विनंती केली आहे.
मला सतत नम्र राहू दे.
मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस.
२. (i) परस्पर सहकार्य
(ii) प्राणिमात्रात आपसी मैत्री
३. मैत्री ही काही ना काही देवाण-घेवाणीतून म्हणजे-उदा. बौद्धिक, आर्थिक, वस्तुरूप या माध्यमातून जास्त प्रमाणात होते असे दिसून येते. या ठिकाणी मैत्रीची स्थिरता शाक्यतो तेवढ्यापुरती किंवा अल्पकाळापुरती राहते. अशी देवाणघेवाण वारंवार किंवा जास्त काळ सुरू असली तर ती वाढत राहते. अन्यथा तिचे प्रमाण कमी दिसते. तेव्हा संतांच्या मते, अरी मैत्री चांगली नाही तर ती टिकली पाहिजे आणि नुसती देवाण-घेवाणपुरती ती असून उपयोगी नाही तर मैत्री ही एकमेकांच्या सुख-दु:खात समरस होणारी आनंद देणारी,
एकमेकाल्गा आधार देणारी आणि आप-पर भाव न मानणारी, चिरकाळ टिकणारी असावी. असा संदेश मैत्रीबाबत संतांनी दिला आहे. त्याचे आपण पालन केले पर श्रेष्ठ मैत्री होईल.
(इ) १. (i) भाषा, भूतकाळाला घेऊन वर्तमानकाळाला सामावून घेऊन भविष्यकाळाकडे वाटचाल करते. भाषा व्यवहाराचे प्रभावी माध्यम आहे.
(ii) भाषा, सांस्कृतिक वारशाचे जतन व पुढच्या पिढीकडे संक्रमण करण्याचे कार्य करते.
२.
विद्याथ्यांचे भावनिक जीवन संतुलित बनते.
उत्तर २ :
(अ) ९. (i) संत रामदास यांच्या मते, वाईट मार्गाने संपत्तीचा संचय करू नये, सभेत लाजू नये व आळसाचे सुख मानू नये.
(ii) संत रामदास यांच्याप्रमाणे सभेत बोलताना न लाजता आपले विचार मांडावेत. निरर्थक बोलू नये.
२.
(i) ओळखल्याविन न खाणारे
(ii) मनात न आणणारे
फळ |
चाहाडी |
३. संत रामदास म्हणतात, शक्यतो कोणाचाही उपकार घेऊ नये आणि जर घेतला तर त्वरित फेडण्याचा प्रयत्न करा, त्याला लांबवत नका ठेवू. कोणालाही दुखवू नका, सर्वांशी प्रेमाने वागावे. कोणाबरोबर विश्वासघात करू नये. सर्वांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा.
४. समर्थ -रामदासाकडून ‘उत्तम लक्षण’ या उपदेशापर रचनेतील या काव्यपंक्ती आहेत. ही रचना त्यांच्या दासबोधातून घेतली आहे. यात रामदासांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत हे सांगितले आहे.
या काव्यात त्यांनी कोठेही जाण्यापूर्वी त्या ठिकाणचा योग्य मार्गाची माहिती घेतल्यारिवाय जाऊ नये. फळ नीट पाहून मगच खावे असे सांगितले आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवावे. मगच कृती करावी.
आपण एखादे कृत्य करतो तेक्हा त्यापासून होणारे चांगले-वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. एखादी कृती होऊन गेल्यावर त्यात बदल करता येत नाहीत. म्हणून कृती करण्यापूर्वीच ती चांगली की वाईट हे पाहून योग्य वर्तन करावे असे समर्थ रामदासांनी या काव्यपंक्तीतून स्पष्ट केले आहे.
(इ) कवयित्री निरजा यांच्या ‘आश्वासक चित्र’ या कवितेतील प्रस्तुत ओळी असून त्यांच्या ‘निरर्थकालीक पक्षी’ या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे.
या चिंतनात्मक कवितेत कवयित्रीने स्री-पुरुष समानतेचे चित्र राब्दबद्ध केले आहे. त्यात त्यांनी वर्णन केलेले चित्र हे उद्याच्या म्हणजे भविष्यातील जगात प्रत्यक्ष उतरणारे उत्साहवर्धक व विश्वासार्ह असे आहे. या कवितेतून कवयित्रीने स्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजविण्याचा यरास्वी प्रयत्न केला आहे.
या कवितेतील मुलगी ‘भातुकलीचा खेळ’ खेळत आहे तर मुलगा ‘चेंडू’ खेळत आहे आणि याच वेळी दोघांमध्ये झालेल्या संवादाचे वर्णन या कवितेत आहे. मुलगी जरी भातुकलीचा खेळ खेळत असली तरी तिला चेंडूचाही खेळ खेळण्याचे आकर्षण वाटते आहे आणि मुलगाही भातुकलीच्या खेळातील काम करून आनंद मानतो. या भातुकलीच्या खेळाच्या छोट्याशा जगातून वास्तव जगाला ते सामोरे जाणार आहेत. यात मुलगी एकाच वेळी दोन्ही म्हणजे भातुकली व चेंडू दोन्ही कामे करण्याचे कसब दाखविते. यातून तिच्यातील आत्मविश्वास दिसून येतो तर मुलगाही तिच्या मताशी सहमत (आश्वासक) आहे. यातून ती मुलगी व मुलगा उद्याच्या जगातील स्री-पुरुष व्यक्तिमत्त्वातील प्रतिनिधी असल्याचे सांगितले आहे. मुलीचे हवेत चेंडू उडवून तो झेलणे व मुलाचे बाहुलीला थोपटणे, भाजीसाठी पातेले शोधणे ही प्रवृत्ती स्री-पुरुष समानतेचे न स्वीकारणारी अरी वाटते.
भातुकलीतून प्रवेशाताना हातात हात असेल; दोघांच्याही यातून विश्वासार्ह असे स्री-पुरुष समानतेचे चित्र आहे. यासाठी यात ‘चेंडू, छोटी बाहुली, पातेले, गॅस’ या प्रतिमांचा वापर केला आहे.
संवादात्मक प्रसंगानुरूप भाषाशैली वापरून एक प्रकारची लय साधली आहे. स्री-पुरुष संमानतेचा संदेश देण्याचा कवयित्रीचा प्रयत्न यरास्वी ठरला आहे.
उत्तर ३ :
१. ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांनी त्यांच्या ‘बालिसाहित्यिका गिरिजा कीर’ या पाठात कोणत्याही साहित्यकृतीचा आस्वाद घेत असतात. लक्षात घ्यावयाचे मुद्दे पुढीलग्र्रमाणे :
(i) साहित्यकृती अभ्यासताना त्याचा वाड्मयप्रकार कोणता हे पाहणे.
(ii) त्यात येणान्या व्यक्तिरेखा व त्यांची स्वभाववैशिष्टये.
(iii) व्यक्तिरेखांचे रेखाटन सहजरीत्या रेखाटले आहे की त्यात कृत्रिमपणा जाणवतो.
(iv) कथानक असेल तर त्यातील आकर्षकता व औत्सुक्यपूर्णता आणि काव्य असेल तर त्यातील विचारसौंदर्य, भावसौंदर्य व आरायसौंदर्य यांचा विचार लक्षात घ्यावा.
(v) लेखकाची किंवा कवीची भाषारौली विचारात घ्यावी.
(vi) सुरुवात व रोवट यांच्यातील ताळमेळ साधला आहे काय ?
(vii) साहृत्यकृतीतून मिळणारा संदेशा, कथानक व त्यातील आराय, कथानकाचा/कवितेचा विषय व त्यातून मिळणारा उपदेश या सर्वांच्या वर्णनातील साहित्यकाराने साधलेली यरास्विता इत्यादी.
२. वीरा राठोड या आधुनिक काळातील कवीने ‘मनक्या पेरेन लागा’ ही कविता त्यांच्या ‘पिढी घडयेरी वाते’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. आहे.
मानवतावादी दृष्टिकोनातून वागून आपण सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे असे कवीने या कवितेत स्पष्ट केले
बी मातीत पडल्यापासून त्याचे झाड होईपर्यंत माती जरी त्याची काळजी घेते; ऊन, वारा, पाऊस , दुष्काळ यांच्यारी सामना करत त्याचे झाड बनविते त्याप्रमाणे माणसांनाही माणूसपण जपले पाहिजे. हे करत असताना इतरांच्या भावना जपल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचे माणूसपणे नष्ट होत आहे. संवेदनशीलता कमी होत आहे.
येणान्या संकटावर जर मात करायची असेल तर माणसाने नि:स्वार्थी भावनेने एकमेकांना मदत केली पाहिजे तरच विश्वरांती निर्माण होईल आणि जगात शांती व समृद्धी नांदेल असा या कवितेचा भावार्थ आहे.
३. मुंबई येथील मध्य रेल्वे पोलीस दलात रेखा मिश्रा या सबइन्प्पेक्टर आहेत. त्यांनी रेल्वेस्थानकावर निरनिराक्या कारणाने भरलेल्या ४३४ मुलांना पालकांपर्यंत सुखरूपपणे पोहोचविण्याचे कार्य केले आहे. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत व भरपूर कष्ट घेतले. त्यासाठी त्यांनी काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचा धाक दाखवून वाईट मार्गपासून मुलांना परावृत्त केले. त्यांना पालकांकडे पोहोचविले. त्यांना रिक्षणाच्या प्रवाहात आणले. याचे पुढील परिणाम दिसून येतात :
(i) अशा भरकटलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबात सुखरूपपणे पोहोचवून त्यांना त्यांच्या पालकांचे छत्र मिळवून दिले.
(ii) अरा मुलांच्या आयुष्याला चांगले वळणण मिळून ती त्यांच्या जीवनाचा आनंद उपभोगू राकले.
(iii) शिक्षण प्रवाहात आल्याने त्यांचे भविष्य चांगले घडण्यास मदत झाली.
अशाप्रकारे रेखा मिश्रा यांनी केलेले हे कार्य सर्व भारतीयांना प्ररांसनीय वाटावे असेच आहे.
उत्तर :
(अ) ९.
(i) | दररोज | प्रत्येक रोजी | अव्ययीभाव समास |
(ii) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैयक्तिक द्वंद्व समास |
२.
प्रत्ययघटित शब्द | उपसर्गघटित शब्द | अभ्यस्त शब्द |
रात्रभर बोटभर | अपयश | गडगडाट |
३. (१) (i) – (क) लक्षपूर्वक ऐकणे, (ii )- (अ) एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे
३. ( १)
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(i) कान देऊन ऐकणे | (क) लक्षपूर्वक ऐकणे |
(ii) तगादा लावणे | (ख) एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे |
(२) (i) मानसीचा पोहण्याचा धीर चेपल्यामुळे ती आता कोठेही पोहू राकते.
(ii) नवीन भ्रमणध्वनींचा डंका वाजविल्यारिवाय त्याचा खप होणे अराक्यच !
( आ) १.
(i) गाभारा
(ii) बहुश्रुत
(२) (i) गळा
(ii) मोर
(३) (i) गरिबी
(ii) अनर्थ
(४) जागा, दूर
२. (i) पुनर्बांधणी
(ii) अंधकार.
(iii) कौटुंबिक
(iv) दीर्घायुष्य
(v) उज्ज्वल
(vi) दुष्काळ
३. (i) स्वल्पविराम
(ii) प्रश्नचिन्ह
४. (i) अनुक्रमणिका
(ii) माननीय
उत्तर ५:
(अ) ९. दिनांक : २ नोव्हेंबर, २०×x
प्रति,
मा. संयोजक,
अक्षरगंधा ग्राफिक्स,
३२, मालाड रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००६?
विषय : सुलेखन कार्यशाळेत प्रवेश मिळण्याबाबत.
महोदय,
मी ‘संपूर्ण आदर्श विद्यालय’ या शाळेत हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रमुख म्हणून काम करतो. आपल्या ‘सुलेखन कार्यशाळेबाबतची’ जाहिरात वाचली. आपण ही कार्यशाळा विनामूल्य चालवणार याचे आपले कितीही कौतुक केले तरी कमी आहे या क्षेत्रातील आपल्या कौराल्याबाबत सर्वांनाच कल्पना आहे. तेव्हा आमच्या हायस्कूलमधील विद्यार्यांना अक्षराइी नव्याने परिचय क्हावा आणि त्यातील विविधता माहीत क्हावी या उद्देशाने दहा विद्यार्थ्यांकरिता आपल्या कार्यशाळेत सहभागी करून घ्यावे अरी आमच्या पदाधिकान्यांची इच्छा आहे.
तरी या दहा विद्यार्थ्यांना आपण आयोजित केलेल्या कार्यशाळेमध्ये सहभागी करून घ्यावे ही विनंती.
कळावे,
आपला,
सही/-
अ. ब. क (विद्यार्थी प्रमुख),
आदर्श विद्यालय, अंधेरी (प.),
मुंबई.
दिनांक : २७ नोक्हेंबर, २०x
किंवा
सागर तळपदे (विद्यार्थी प्रमुख),
आदर्श विद्यालय, अंधेरी (प.),
प्रिय मित्र अक्षय, यांस मनःपूर्वक अभिनन्दन,
अक्षरगंधा ग्राफिक्स यांनी दि. ८ ते २५ नोक्हेंबर पर्यंत आयोजित केलेल्या सुलेखन कार्यशाळेमध्ये आपल्या हायस्कूलचे दहा विद्यार्थी पाठविले होते. त्यामध्ये तुझया सुलेखनाचे विशेष कौतुक करण्यात आले हे ऐकून फार समाधान झाले. तुइ्यामुळे आपल्या संस्थेचा नाव लौकिक झाला. तू जो छंद जोपासलास व त्यासाठी अविश्रांत श्रम केलेस; ज्यामुळेच तुला हे यशा प्राप्त झाले. अभ्यास सांभाळून असेच खूप-खूप कष्ट घेऊन यशाच्या शिखरावर विराजमान हो. असो !
पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन. घरी मानाप्रमाणे सर्वांना नमस्कार सांग. आई, बाबा व इतर सर्व जण कौतुक करत असतील.
तुझा खास वर्गमित्र, सागर
किंवा
२. मानवाच्या दैनंदिन व्यवहारात भाषा हे एक सशक्त माध्यम आहे. वर्तमानपासून ते भविष्यकाळापर्यंत याची सोबत असते. त्याचबरोबर सांस्कृतिक वारशाचे जतन व त्यात पडणारी भर हे भाषेमुळेच शक्य आहे. म्हणून मुलांच्या प्राथमिक स्तरापासून अश्या भाषा साहित्याचा समावेश केला जातो ज्यामुळे मुलें संस्कारवान होतात, साहित्य अभिरुची वाढून राष्ट्र व समाज निर्माणाची ते जबाबदारी उचलतात. हेच जीवनाचा खरा उद्देश भाषा पूर्ण करते.
(आ) ९.
नटसम्राट बालगंधर्वांच्या ५९व्या स्मृतिदिनानिमित्त
नाट्य संगीत महोत्सव
सादरकर्ते : बालगंधर्व रसिक मंडळ, मुंबई
कल्गकार : हर्षद पंडित, रविंद्र जोशी, आर्या देसाई,
कुणाल भागवत, ह्यषिकेरा चौधरी
स्थळ
नटराज हॉल
पनवेल
प्रवेरा विनामूल्य
२. शाकेतील साजरा करण्यात आलेल्या वृक्षारोपण वृत्तांत
शिरपूर, ५ जुलै २०२० (वार्त्ताहर)
दिनांक ४ जूलै रोजी शिरपूर येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक कनिष्ठ विद्यालयात/महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिरपुरातील आमदार माजी रवीन्द्र राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरवर्षी। ४ जुलै ते ७ जुलै पर्यंत शासनातर्फे ‘वन महोत्सव’ साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले. वृक्षारोपणाची सर्व व्यवस्था शांळेच्या आवारात करण्यात आली. शाळेत असलेल्या एका प्रेक्षणीय बागेत हे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले. शाळेचे मुख्याध्यापक श्री मुकुल सोवनी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शोळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिवाकर म्हात्रे यानी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुरुवातीला सर्वप्रथम पाहुण्यांनी बागेत ‘अशोकचे’ झाड लावले यानंतर मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांनी पण बागेत अशोक, लिंब, पींपळाचे झाडे लावले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक सुंदर कार्यक्रम ‘वृक्ष संवर्धन काळाची गरज’ आयोजित केले. प्रमुख पाहुणे आमदार माजी रवीन्द्र राऊत भाषण करून ‘वन महोत्सव’ दिनाच्या शुभेच्छा दिल्या व इतका सुंदर कार्यक्रम पार पाडल्या शाळेच्या विद्याथ्यांचे आभार मानले. वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचे आहे. वृक्ष नाही तर जीवन सृंष्टीच नष्ट होईल हा विचार त्यांनी मांडला. शिक्षिका सौ. स्मृती करमरकर यानी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
३. अंधार असल्यामुळे त्या अंधारात नीटसे काही दिसले नाही. तो तसाच झपाझप चालू लागला. त्याच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. त्याला वाटले, मागून येणारा कोणीतरी चोर किंवा लुटारू असेल. तो जर लुटारू असेल तर आपल्याला पकडणार,
आपल्याकडील पैसे काढ़न घेणार. आपण पैसे दिले नाही तर तो मारहाण करेल. त्याच्याबरोबर आणखी त्याचे साथीदार आहेत का? कोणास ठाऊक त्याच्याजवळ काही शस्त्र वगैरे असेल काय ? अशा अनेक शंकांनी त्याच्या मनामध्ये काहूर केले. काही प्रश्नांचे उत्तर त्याला सापडेना. त्याने आपल्या पायाचा वेग वाढविला. थंडीचे दिवस असूनसुद्धा अंगाला घाम सुटला. काय करावे हे सुचेना.
त्याच्या मनात आले की चोर असेल तर एवढया पहाटे कराला आला असेल ? राक्यतो ते रात्रीच असतात. कदाचित रात्री हिंडून-हिंडून काही मिळाले नसेल म्हणून तो आता आपल्या मागे लागला असेल. देवा, या चोरावर मीच आता सापडलो काय ? असा देवांचा धावा करू लागला. त्याने खिशात पैसे आहेत काय हे चाचपून बघितले. पैसे हाताला व्यवस्थित लागले. साधारण मान इकडे-तिकडे करून तो त्याचा अंदाज घेऊ लागला; पण तो व्यर्थ ठरला. काही कळेना आणि सुचेना.
तो आहे तसाच पुढे चालू लागला. आता कानावर काही शब्द ऐकू येऊ लागले. नंतर-नंतर त्याचे नाव त्याला ऐकू येऊ लागले. तो मनात म्हणतो की माझे नाव चोराला कसे माहीत ? या विचारात असताना पायाचा वेग कमी झाला आणिं खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. क्षणभर तारांबळ उडाली. सर्व बळ एकवटून तो पाहतो तो काय ? त्याचा डोळयावर विश्वासच बसेना, तो पाठीमागून येणारा दुसरा-तिसरा कोणी नसून त्याच्याच गल्लीतील राम होता. त्याचा परम आणि जिवलग मित्र !
(इ) १. महिलांचा क्रीडामंत्र्याचे हस्ते सत्कार या प्रसंगी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व विशोष काही कामकाज ऑफिसमध्ये नसल्यामुळे मी त्यादिवशी रजेवर होतो. तेव्हा रजेवर आहे तर आपलीही काही कामे करावीत म्हणून फेरफटका मारता-मारता माइया मित्राच्या घरी गेलो. तो घरीच होता. मला पाहून त्याला जरा बरे वाटले. कारण त्यादिवशी त्याला एका कार्यक्रमाचे पास मिळाले होते. तेव्हा तो विचारात होता की, आता कोणाला बरोबर घेऊन जावे ? तोपर्यंत मी दिसल्यामुळे त्याने त्या कार्यक्रमाबद्दल मला विचारले. मी क्षणार्धात त्याला होकार दिला. तो कार्यक्रम होता-महिला विश्वचषकात भरघोस यश मिळविणान्या महिलांचा क्रीडामंत्राच्या हस्ते सत्कार.
आम्ही दोघे पवईमधील बिर्ला क्रीडा सभागृहामध्ये सकाळी साडेदहाच्या दरम्यान पोहोचलो. हॉल बराचसा भरलेला होता. आम्ही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो. संयोजकांची धावपळ सुरू होती. नेहमीप्रमाणे इतरांचेही आवाज, गडबड-गोंधळ चालू होते. व्यासपीठावरील आवराआवर चाललेली होती. इतक्यात बाहेर शिट्टयांचा आवाज येऊ लागला. माननीय क्रीडामंत्राचे व्यासपीठावर आगमन झाले. इतरही पदाधिकारी आपापल्या स्थानावर विराजमान झाले. व्यासपीठावर आता प्रमुख पाहुणे सत्कारमूर्ती आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रथम स्वागत पद्य, ईश स्तवन, पाहुण्यांचा परिचय, कार्यक्रमाचे उद्दिष्ट इत्यादी सांगून झाल्यावर सत्कारमूर्तीचा सत्कार झाला. अन्य मान्यवरांनी भाषणे करून महिला संघाच्या या भरघोस यशाबद्दल कौतुक केले. प्रत्येकाने क्रीडा-शिक्षणाची किती गरज आहे व क्रीडांक्षेत्र किती व्यापक आहे हे सांगितले. वक्त्यांच्या भाषणावरून क्रीडाक्षेत्राची महती सर्व.प्रेक्षकांना किती अगाध आहे हे समजून आले. मलाही या कार्यक्रमास येऊन क्रीडाक्षेत्राची जास्त माहिती मिळविता आली याबद्दल आनंद वाटला. या क्षेत्राची व्यापकता आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही या संघाच्या महिलांनी तसेच अन्य खेळाड़ंनी धडपड करून कसे यशा मिळवितात याचा क्रीडामंत्र्यांनी जवळून आढावा घेतला आणि या क्षेत्राला जास्तीतजास्त निधी मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील असण्याबाबत ग्वाही दिली. त्यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रम संपल्याचे संयोजकांनी जाहीर केले आणि मग आम्ही एका वेगळ्या आनंदात घरी.आलो.
२. रविवारचा सुट्टीचा दिवस. म्हणून मी आवराआवर सुरू केली. अभ्यासाचे टेबल पुस्तकाने भरून गेले होते. एक-एक पुस्तक चाळून आणि त्यावरील धूळ झाडून मी कपाटात ठेवत होतो. मराठीचे पुस्तक घेतले आणि त्याकडे विरोष लक्ष न देता मी ते तसेच बाजूला ठेवून दिले. तोच माइया कानात काही राब्द ऐकू येऊ लागले. असे ! हे काय ? मला का बाजूला ठेवले ? हे ऐकून मी एका वेगळ्या विश्वात गेल्याचे भासले.
माझया कानावर ऐकू येणारे शाब्द हे अन्य कोणतेही नसून त्या मराठी पुस्तकाचे होते. ते म्हणत होते की, “मला असे बरेच जण सुद्धा बाजूला ठेवतात. आता माझी काही गरज उरली नाही असे त्यांना वाटते.” ‘गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे माइ्याकडे लक्षपण देत नाही ? जो तो इंग्रजी, हिंदी, गणित या पुस्तकांना मात्र वारंवार जपत असतो. अगदी कौतुकाने त्याच्याकडे पाहत असतो आणि मला मात्र सक्तीची वागणूक मिळते.
सर्व लोक हे विसरतात की ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीता ही मराठीतून लोकांना समजण्यासाठी लिहिली. तोच ग्रंथ आता ज्ञानेश्वरी म्हणून लोक त्याची पारायणे करतात. या ग्रंथामुळे सामान्यांना गीतेचा अर्थ समजला. त्याप्रमाणे काहींनी आपल्या वागण्यात बदल केला. संस्कृत ही भाषेची जननी म्हटले जाते. त्यानंतर मराठीचा नंबर लागतो. हे सर्व जण विसरतात. संस्कृतमधील अवघड गोष्टी मराठीमध्ये सहज सोप्या राब्दात बच्याच जणांनी सांगितल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर लो. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला. तो अनेकांनी वाचून त्यांची प्ररांसा केली. अशी मराठी भाषा सुंदर असताना लोक आता त्या पुस्तकाकडे दुर्लक्ष करतात. सहज सोपी भाषा, आलंकारिक भाषा, रसाळ व गोडवा असणारी भाषा असे अनेक गुण यामध्ये सांगता येतील.
एवढे सर्व मी ऐकत असतानां आईची हाक कानावर आली आणि मी भानावर आलो. मराठीचे पुस्तक सांगत होते, ते संपूर्णपणे खरे आहे. या पुस्तकासाठी दुजाभाव असू नये. आपण आपली मराठी भाषा श्रेष्ठ मानली पाहिजे व तिचे श्रेष्ठत्व जपले पाहिजे.
श्रम हा ऐहिक सुखाचा मूळमंत्र आहे. प्रकृती उत्तम राहाण्यासाठी शरीराला श्रम आवश्यक आहे. शरीर निरोगी व सुदृढ़ ठेवण्यासाठी श्रम आवश्यक आहे. शारीरिक कष्टामार्फंत होणारे श्रमाचे मूल्य जास्त महत्त्वाचे आहे. अंगमेहनतीद्वारे होणारे श्रम फार महत्त्वाचे आहे कठोर परिश्रमास पर्याय नाही.
प्राचीन वेदकाळात श्रमाचे महत्त्व सर्व मान्य होते. गुरुकुल पद्धतीत श्रमसाधना आणि श्रमसंस्कार याला फार महत्त्व होते. व्रतबंधन झाल्यानंतर बटुकाला ब्रह्मचर्य आश्रमात ऋषी मुनींच्या देखरेखात विद्या ग्रहण करण्यासाठी शिक्षण संपेपर्यंत राहावे लागे. वेदकालीन गुरुकुल पद्धतीत विद्याग्रहण बरोबरच बटुकाला गुरुपत्नीच्या घरकामात मदत करावी लागते. त्याशिवाय बाहेरकाम जसे जंगलातून लाकडे तोडून आणणे, फूले वेचणे, समिधा गोळा करणे, योगासने करणे, पाणी भरणे इ. कामे पण विद्यार्थांना करावे लागतात. त्याचमुळे विद्याथ्यांना श्रमाचे महत्त्व कळते व शारीरिक सौष्ठव प्रतिष्ठा आपोआपच प्राप्त होते. ब्रीटीश काळात आंग्ल विद्याविभूषण पद्धतीत होणारे शिक्षणात श्रमांचे संस्कार नाहीत.
मानवतेचे महान सेवक व उच्चपदवी विभूषित क्रमशः महात्मा गांधी, सेनापति बापट, विनोवा भावे, साने गुरुजी यांनी स्वतः शारीरिक श्रमांची कामे करवून जनतेला श्रमसंस्काराचे उदाहरण प्रस्तुत केले.मोकळया हवेत रोज सकाळी धावणे, भरभर चालणे, बागकाम करणे, योगासने करणे इ. प्रकारे घामाघूम श्रमाने शरीर सुदृढ़, निरोगी, स्वास्थ्य व चांगले राहते.
शारीरिक श्रमाने शरीर मधुमेह, रक्तदाब, सांधेदुखी, पोट वाढणे व लठ्ठपणा रोगाने मुक्त राहतो. शारीरिक श्रम योग्य प्रमाणात रोज करणे आवश्यक आहे. अतिश्रमाने शरीर अस्वस्थ्य होण्याची शक्यता असते. प्रत्येक श्रमानंतर थोडी विश्रांती घ्यावी म्हणजे गेलेला जोम, ऊर्जा, उत्साह पुन्हा परत येतो. शरीर व मन परत ताजेतवाने व प्रसन्न होतो.
🔥🔥 Join Our Group For All Information And Update, Also Follow Me For Latest Information🔥🔥
🔥 Follow US On Google News Click Here
———————————————————————-
🔥 Whatsapp Group Join Now Click Here
———————————————————————-
🔥 Facebook Page Click Here
———————————————————————-
🔥 Instagram Click Here
———————————————————————-
🔥 Telegram Channel Click Here
———————————————————————-
🔥 Twitter Click Here
———————————————————————-
🔥 Website Click Here
———————————————————————-